Instant Loan | आजच्या काळात अचानक पैशांची गरज कुणालाही लागू शकते. घरखर्च, शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेकजण बँकेकडून कर्ज घेतात. पण अनेकांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो की, “नोकरी किंवा नियमित उत्पन्न नसताना बँक लोन देते का? तर याचं उत्तर आहे हो. काही अटी पूर्ण केल्यास कमी उत्पन्न किंवा उत्पन्न नसतानाही बँक लोन मिळू शकतं. Instant Loan
आधार कार्डवर ₹५० हजारांपर्यंत कर्ज! छोट्या व्यावसायिकांसाठी सरकारची मोठी योजना; मोबाईलवरून अर्ज करा
आधार कार्डवर ₹५० हजारांपर्यंत कर्ज! छोट्या व्यावसायिकांसाठी सरकारची मोठी योजना; मोबाईलवरून अर्ज करा
आधार कार्डवर ₹५० हजारांपर्यंत कर्ज! छोट्या व्यावसायिकांसाठी सरकारची मोठी योजना; मोबाईलवरून अर्ज करा
काही बँका ग्राहकांचे बँक व्यवहारही तपासतात. तुमच्या खात्यात नियमित पैसे जमा होत असतील, व्यवहार चांगले असतील आणि खाते निगेटिव्हमध्ये जात नसेल तर बँक स्टेटमेंटच्या आधारावरही कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जरी निश्चित नोकरी नसली तरी आर्थिक व्यवहार मजबूत असणे महत्त्वाचे ठरते.
तसेच FD किंवा म्युच्युअल फंड असलेल्या लोकांनाही सहज कर्ज मिळू शकते. तुमच्याकडे फिक्स डिपॉझिट असल्यास त्यावर लोन मिळतं. अनेक बँका FD च्या ७० ते ९० टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड SIP नियमित भरत असाल तर त्याच्या आधारावरही कर्ज मिळू शकतं.
मात्र कोणतंही कर्ज घेताना सिबिल स्कोर खूप महत्त्वाचा असतो. तुमचा CIBIL Score 700 पेक्षा जास्त असेल तर बँकेचा विश्वास वाढतो आणि लोन मंजूर होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वी घेतलेली कर्जे वेळेत भरलेली असणेही तितकेच आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, उत्पन्न नसतानाही लोन मिळू शकतं, पण परतफेडीची क्षमता तपासूनच बँका निर्णय घेतात. त्यामुळे कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी EMI भरता येईल का याचा विचार करणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने घेतलेले कर्ज पुढे आर्थिक अडचणी निर्माण करू शकते.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य माहितीसाठी आहे. कर्ज घेण्यापूर्वी संबंधित बँक किंवा आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
2 thoughts on “एका मिनिटात मिळणार बँकेकडून लोन ! फक्त ‘हे’ काम करा, पैसे थेट खात्यात जमा”