1 मिनिटात जमिनीचा नकाशा डाऊनलोड करा

Gut number takun jaminicha nakasha kasa kadhava | मोबाईलवर जमिनीचा नकाशा असा डाऊनलोड करा (Step-by-Step Process):भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत पोर्टलवरून अवघ्या एका मिनिटात नकाशा डाऊनलोड करण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा:पायरी १: अधिकृत भू-नकाशा पोर्टल उघडा:सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट ब्राऊझर उघडा आणि mahabhunakasha.mahabhumi.gov.in या अधिकृत शासकीय संकेतस्थळाला भेट द्या.

पायरी २: Rural / Urban पर्याय निवडा:मुख्य पानावर डाव्या बाजूला असलेल्या तीन रेषांवर (Menu) क्लिक करा. जर तुमची जमीन ग्रामीण भागात असेल तर ‘Rural’ आणि शहरात असेल तर ‘Urban’ हा पर्याय निवडा.पायरी ३: जिल्हा, तालुका आणि गाव निवडा:त्यानंतर ड्रॉपडाऊन मेनूमधून तुमचा जिल्हा (District), तालुका (Taluka) आणि गाव (Village) अचूक निवडा.पायरी ४: शेताचा गट नंबर प्रविष्ट करा:गाव निवडल्यानंतर खाली दिलेल्या ‘Search by Plot Number / Gut Number’ या रकान्यात तुमच्या शेताचा गट नंबर (Gut Number) टाईप करा आणि सर्च करा.पायरी ५: नकाशा तपासा आणि PDF डाऊनलोड करा:गट नंबर टाकतात स्क्रीनवर तुमच्या शेताचा नकाशा, चारही बाजूंचे बांध आणि शेजारचे गट नंबर स्पष्ट दिसतील. खालील ‘Map Report’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा उच्च दर्जाच्या PDF स्वरूपात (HD PDF) थेट मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता.

जमिनीच्या डिजिटल नकाशाचे कायदेशीर फायदे काय?

​१. बांधावरील वाद कायमचे मिटतात: नकाशामध्ये शेताची लांबी, रुंदी आणि चारही बाजूंच्या सीमा अचूक दिलेल्या असतात, ज्यामुळे बांधाचे वाद मिटवणे सोपे होते.

२. शेताचा अधिकृत रस्ता समजतो: नकाशात पाणंद रस्ते, शेतरस्ते आणि सरकारी वहिवाटीच्या रस्त्यांची अचूक नोंद स्पष्टपणे दिसते.

३. जमीन खरेदी करताना फसवणूक टळते: नवीन जमीन खरेदी करताना प्रत्यक्षात जागेवर असलेली जमीन आणि सरकारी नकाशातील जमीन एकच आहे का, याची खात्री करता येते.

४. बँक कर्ज व अनुदानासाठी उपयुक्त: शेतीवर तारेचे कुंपण, विहीर किंवा शेततळ्यासाठी शासकीय अनुदान हवे असल्यास हा नकाशा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातो.