१८८० पासूनचे जुने सातबारे आणि फेरफार उतारे आता मोबाईलवर पाण्यासाठी येथे क्लिक करा
परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांचा हा त्रास कायमचा संपवला आहे. ई-अभिलेख (e-Abhilekh) या आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून तब्बल १८८० सालापासूनचे जुने सातबारे (७/१२), ८-अ आणि फेरफार उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. आता हे ऐतिहासिक अभिलेख तुम्ही थेट तुमच्या मोबाईलवरून अगदी मोफत पाहू शकता आणि डाऊनलोडही करू शकता.
जुने सातबारे आणि फेरफार तपासणे का गरजेचे आहे?
- जमिनीचा खरा इतिहास समजतो: जमीन मूळ कोणाची होती आणि वेळोवेळी त्यात काय बदल झाले, याची संपूर्ण नोंद मिळते.
- कौटुंबिक वाटणीत पारदर्शकता: खापरपणजोबा किंवा आजोबांच्या काळातील मूळ क्षेत्र किती होते हे स्पष्ट झाल्याने वाटणीचे वाद मिटतात.
- फसवणूक टाळण्यासाठी: जमिनीची खरेदी-विक्री करताना जुन्या नोंदींमध्ये काही त्रुटी किंवा जुने वाद आहेत का, हे आधीच तपासता येते.
- न्यायालयीन प्रकरणांसाठी पुरावा: जुना फेरफार किंवा सातबारा हा जमिनीच्या वादात सर्वात भक्कम कायदेशीर पुरावा मानला जातो.
१८८० पासूनचे जुने सातबारे आणि फेरफार उतारे आता मोबाईलवर पाण्यासाठी येथे क्लिक करा
मोबाईलवरून जुना सातबारा व फेरफार पाहण्याची सोपी पद्धत
१. पोर्टलला भेट द्या:
मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये शासनाच्या अधिकृत ई-अभिलेख पोर्टलला (aapleabhilekh.mahabhumi.gov.in) भेट द्या.
२. नोंदणी आणि लॉगिन:
जर तुम्ही पहिल्यांदाच वापरत असाल, तर ‘New User Registration’ वर क्लिक करून साधी माहिती भरून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करा. त्यानंतर लॉगिन करा.
३. जिल्हा आणि तालुक्याची निवड:
लॉगिन झाल्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि अभिलेख कार्यालय निवडा.
४. कागदपत्राचा प्रकार निवडा:
तुम्हाला काय पाहायचे आहे (उदा. जुना ७/१२, फेरफार पत्रक किंवा ८-अ) तो पर्याय निवडा.
५. वर्ष आणि गट नंबर टाका:
संबंधित जमिनीचा जुना गट नंबर किंवा सर्व्हे नंबर टाका आणि शोध वर्षाचा पर्याय निवडा.
६. कागदपत्र डाऊनलोड करा:
स्क्रीनवर जुन्या कागदपत्रांची डिजिटल स्कॅन प्रत दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ते सहज मोबाईलमध्ये सेव्ह किंवा डाऊनलोड करू शकता.